क्रिकेट चाहत्यांना गुरुवारी 23 एप्रिलला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) सर्वात मोठा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील 2 सर्वात यशस्वी संघ आमनेसामने असणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात हा सामना होणार आहे. हार्दिक पंड्या मुंबईचं नेतृत्व करणार आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे यलो आर्मीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील सातवा सामना असणार आहे. मुंबईच्या नेट रनरेटचा अपवाद वगळता दोन्ही संघांचे आकडे सारखेच आहेत. दोन्ही संघांना या मोसमात आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता दोन्ही संघांचा एकमेकांसमोर चांगलाच कस लागणार आहे. या निमित्ताने मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यातील महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कधी?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना गुरुवारी 23 एप्रिलला होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना वानखेडे स्टेडियम, मुंबई इथे होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स पाहायला मिळेल. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहता येईल. तर उभयसंघातील सामन्यातील लाईव्ह अपडेट्स https://www.tv9marathi.com/sports/cricket-news या लिंकद्वारे जाणून घेता येतील.
दोन्ही संघांची 19 व्या मोसमातील कामगिरी
दरम्यान मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी या हंगामात प्रत्येकी 6-6 सामने खेळले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट चांगला असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईच्या पुढे आहेत. मुंबई 4 गुणांसह सातव्या तर चेन्नई आठव्या स्थानी आहे. मुंबईचा नेट रनरेट प्लस तर चेन्नईचा मायनसमध्ये आहेत. त्यामुळे चेन्नई मुंबईला पराभूत करुन पुन्हा कमबॅक करणार की मुंबई विजयी घोडदौड कायम राखणार हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.





