Monday, September 25, 2023
Homeसांगलीऊस काढताना विद्यार्थी ठार

ऊस काढताना विद्यार्थी ठार

वज्रवाड (ता.जत) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रालीमधून ऊस काढताना तोल जाऊन एक विद्यार्थी जागीच ठार झाला आहे. राहुल नानासाहेब चिंतामणी (वय-१६) ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राहुल हा वज्रवाड हायस्कूलचा विद्यार्थी होता. यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,    सध्या बिळुर परिसरात ऊसतोड चालू आहे .बिळुर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर हल्याळ (ता. अथणी) येथील कृष्णा शुगर या कारखान्याकडे जात होता.

दरम्यान वज्रवाड हायस्कूलला मध्यान्ह जेवणाची सुट्टी होती. यावेळी ट्रॅक्टर हायस्कूल समोरून जात होते. राहुल हा ट्रालीवर चढून ऊस काढत होता. तोल जाऊन ट्रालीच्या मागील चाकाखाली सापडला चाक डोक्यावरून गेल्यानं राहुलचा जागेवर मृत्यू झाला. राहुल हा इयत्ता दहावी वर्गात शिकत होता. सदर घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते .

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र