राज्याच्या विविध भागात तापमानाचा पारा चांगलाच वाढताना दिसून येत आहे. राज्यातील जवळपास 22 जिल्ह्यांत तापमानाने चाळिशीचा पारा ओलांडला आहे. इतकेच नाही तर काही भागांत तापमानाने 45 अंशांचा टप्पाही ओलांडला आहे.
त्यातच आता हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा (Heat Wave Alert) दिला आहे. काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज (Orange Alert of Heat Wave) अलर्ट तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (Yellow Alert of Heat Wave) देण्यात आला आहे.
7 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, कोकण-गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही तुरळक भागांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. तर राज्यातील सात जिल्ह्यांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. यामध्ये अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर चार जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कुठे अवकाळी पाऊस बरसणार?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता आहे.
शनिवारी कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?
अकोला – 45.6 अंश सेल्सिअस
अमरावती – 45.6 अंश सेल्सिअस
वर्धा – 45.5 अंश सेल्सिअस
नंदुरबार – 44.7 अंश सेल्सिअस
चंद्रपूर – 44.2 अंश सेल्सिअस
नागपूर – 44.2 अंश सेल्सिअस
गोंदिया – 43.6 अंश सेल्सिअस
मालेगाव – 43.4 अंश सेल्सिअस
वाशिम – 43 अंश सेल्सिअस
यवतमाळ – 43 अंश सेल्सिअस
परभणी – 42.7 अंश सेल्सिअस
बुलढाणा – 42.2 अंश सेल्सिअस
सोलापूर – 42 अंश सेल्सिअस
बीड – 41.9 अंश सेल्सिअस
छत्रपती संभाजीनगर – 41.8 अंश सेल्सिअस
नाशिक – 41.5 अंश सेल्सिअस
अहिल्यानगर – 41.2 अंश सेल्सिअस
धाराशिव – 41 अंश सेल्सिअस
जालना – 41 अंश सेल्सिअस
पुणे – 40.9 अंश सेल्सिअस
सांगली – 40.2 अंश सेल्सिअस
सातारा – 40.2 अंश सेल्सिअस
राज्यातील कमाल आणि किमान तापमान
कमाल तापमान – पुढील 24 तासांत महाराष्ट्र प्रदेशात कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतरच्या 4-5 दिवसांत 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल. 26-27 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कमाल तापमानात 42-44 अंश सेल्सिअस दरम्यान असण्याची दाट शक्यता आहे.
किमान तापमान – पुढील 3 दिवसांत महाराष्ट्र प्रदेशात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतर महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल.
पुढील हवामानाचा अंदाज
27 एप्रिल
कोकण – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ – हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

