Tuesday, April 28, 2026
Homeक्रीडादिल्लीचा 39 बॉलमध्ये धुव्वा, आरसीबीचा 9 विकेट्सने ‘विराट’ विजय

दिल्लीचा 39 बॉलमध्ये धुव्वा, आरसीबीचा 9 विकेट्सने ‘विराट’ विजय

दिल्ली कॅपिट्ल्सने 25 एप्रिलला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील आपली सर्वोच्च 264 धावसंख्या उभारली होती. मात्र 48 तासांतच दिल्लीची गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर दुर्दशा झाली. दिल्लीला आपल्या मोहिमेतील 8 व्या सामन्यात संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आरसीबीने दिल्लीला अरुण जेटली स्टेडियममध्ये 21 बॉलआधी ऑलआऊट केलं. आरसीबीसमोर दिल्लीचं 16.3 ओव्हरमध्ये 75 रन्सवर पॅकअप झालं. त्यामुळे आरसीबीला 76 धावांचं आव्हान मिळालं. आरसीबीने हे आव्हान 81 बॉलआधी 1 विकेट गमावून पूर्ण केलं. आरसीबीने 6.3 ओव्हरमध्ये 77 धावा केल्या. आरसीबीने अशाप्रकारे 9 विकेट्सने दिल्लीचा धुव्वा उडवला. आरसीबीने यासह 19 व्या मोसमातील आपला सहावा विजय मिळवला. तर दिल्लीचा घरच्या मैदानातील हा या हंगामातील तिसरा पराभव ठरला.

 

आरसीबीच्या गोलंदाजांचा कहर

आरसीबीने टॉस जिंकला. कॅप्टन रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी कर्णधाराचा निर्णय अचूक ठरवला. जोश आणि भुवनेश्वरने दिल्लीच्या पहिल्या 6 फलंदाजांना 25 बॉलमध्ये आऊट केलं. दिल्लीच्या पहिल्या 6 पैकी तिघांना भोपळाही फोडता आला नाही. दोघांनी प्रत्येकी 1-1 धाव केली. तर एकाने 5 धावा जोडल्या आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

 

डेब्युटंट साहील पारख, समीर रिझवी आणि कॅप्टन अक्षर पटेल या तिघांना भोपळाही फोडता आला नाही. केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी प्रत्येकी 1-1 धावा केली. कुलदीप यादव याने 3 धावा जोडल्या. तर फक्त तिघांनाच दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारता आली. दिल्लीसाठी अभिषेक पोरेल याने सर्वाधिक 30 धावा केल्या. डेव्हीड मिलर याने 19 तर कायले जेमिसन याने 12 धावा केल्या. आरसीबीसाठी जोश हेझलवूड याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर भुवनेश्वर कुमार याने 3 फलंदाजांना आऊट करत आरसीबीच्या टॉप आणि मिडल ऑर्डरला ढेर केलं. तर रसीख सलाम डार, सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवत दिल्लीला गुंडाळण्यात योगदान दिलं.

 

आरसीबीचा दणदणीत विजय

जेकब बेथल आणि विराट कोहली या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 26 धावांची सलामी भागीदारी केली. जेकबने 20 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर विराट आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी उर्वरित धावा करुन आरसीबीला विजयी केलं. विराटने नाबाद 23 धावा केल्या. तर देवदत्तने नाबाद 34 धावांची फायर खेळी केली. तसेच कायले जेमीसन याने एकमेव विकेट मिळवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -