Tuesday, April 28, 2026
Homeब्रेकिंगप्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा...

प्रतीक्षा संपणार, लवकरच लागणार 12 वीचा रिझल्ट निकालाबाबत मोठी अपडेट समोर, कसा कराल चेक ?

महाराष्ट्र राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली असते. यंदा या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांची रिझल्टची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण एचएससी रिजल्ट 2026 जाहीर करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. यासदंर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.

 

वर्षभर मान मोडून अभ्यास केला, परीक्षाही दिली आता वेध लागलेत ते निकालाचे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) लेखा परीक्षा आयोजित करण्यात येते. 12 वीच्या विद्यार्थ्यांची निकालीच उत्सुकता शिगेला पोहोचली असून निकाल कधी लागणार हे जाणून घेण्यास सर्वच विद्यार्थी अधीर झाले आहेत. (results)याच 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मोठी अपडेट समोर आली आहे. हाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच एचएससी (HSC) निकाल 2026 जाहीर करण्याच्या तयारीत आहे. हा निकाल डिजीलॉकरवर देखील जाहीर करण्यात येणार असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह अधिकच वाढला आहे.

 

विशेष म्हणजे मंडळाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर निकाल तपासण्याची लिंक सक्रिय केली आहे. येत्या एक-दोन दिवसांत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. (results)त्यामुळे लाखो विद्यार्थी आपले गुण जाणून घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांतच, मे महिन्याचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात 12 वीच्या परीक्षेचा निकाल लागू शकतो. निकालीच तारीख लवकरच जाहीर होईल आणि त्यानंतर दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांना निकाला पाहता येऊ शकेल. यंदा विद्यार्थी दोन माध्यमांद्वारे आपला निकाल तपासू शकतील : पहिलं म्हणजे मंडळाची अधिकृत वेबसाइट आणि दुसरा पर्याय म्हणजे, डिजीलॉकर. हा निकाल चेक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आवश्यक लॉगिन तपशील वापरावा लागेल. डिजीलॉकरवरून डिजिटल गुणपत्रिका देखील डाउनलोड करता येतील, ज्या भविष्यात वापरण्यासाठी वैध ठरतील.

 

निकाल जाहीर करण्यापूर्वी मंडळाकडून डेटा अपलोड आणि तांत्रिक तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे निकालाची तारीख आणि वेळ निश्चित केली जाईल. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाची एचएससी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला 14 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते आणि आता ते त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.

 

असा चेक करा तुमचा रिझल्ट

 

– HSC रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– तुमचा रोल नंबर आणि इतर माहिती भरा.

– ते सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

– तुमची मार्कशीट डाऊनलोड करा

 

– निकाल चेक करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की (results)त्यांनी आपलं प्रवेशपत्र तयार ठेवावं आणि अधिकृत वेबसाइट नियमितपणे तपासावी, कारण निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो.

 

या वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल

12 वीचे विद्यार्थी हे खाली दिलेल्या वेबसाईट्सवर निकाल तपासू शकतील.

1) mahresult.nic.in

2) hscresult.mkcl.org

3) reslts.digilocker.gov.in

4) mahahsscboard.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -