Friday, May 1, 2026
Homeमहाराष्ट्रमोठा दणका! थेट एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ, आजपासून तब्बल..

मोठा दणका! थेट एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ, आजपासून तब्बल..

इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजीचे मोठे संकट निर्माण झाले. सुरूवातीला एलपीजी गॅसच्या किमतीमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, एसपीजी गॅसच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही. मात्र, आजपासून देशभरात एलपीजी गॅसच्या सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. पश्चिम बंगाल आणि आसामासह काही राज्यातील निवडणुका संपताच एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. सर्वसामान्य माणसाला हा अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. सरकारने कमर्शियल सिलेंडर 19 किलोच्या सिलेंडरमध्ये वाढ केली. सरकारी कंपन्यांनी 1 मे 2026 रोजी कमर्शियल सिलेंडरच्या किमतीमध्ये 993 रूपयांनी वाढ केली. या वाढीमुळे आता कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमती 3 हजारच्या आसपास पोहोचल्या आहेत.

 

सर्वसामान्य लोकांना दिलासा देत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नाही. एएनआयच्या रिपोर्टनुसार, 19 किलो सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीनंतर 1 कमर्शियल सिलेंडरची किमत 3071 रूपयांपर्यंत पोहोचली आहे. 1 एप्रिलपर्यंत या सिलेंडरची किमत 2078 रूपये होती. मे महिन्यात थेट 993 रूपयांनी सिलेंडरची किमत वाढली आहे.

 

इराण आणि अमेरिका युद्धात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. त्यामध्येच अनेक व्यावसायिकांनी थेट हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आता या वाढलेल्या किमतीमुळे हॉटेल चालक पदार्थांच्या किमतीमध्ये मोठी वाढ करू शकतात. तो थेट फटका ग्राहकांना बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती की, एलपीजी सिलेंडच्या किमतीमध्ये वाढ होईल आणि ती झाली. एलपीजी सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीनंतर हॉटेल पदार्थांच्या किमती वाढू शकतात.

 

होर्मुज खाडी बंद असल्याने जग वेगळ्या संकटात आहे. एलपीजी गॅसची आयात आणि निर्यात ठप्प आहे. भारताच्या शेजारील देशात तीनतेरा वाजले आहेत. त्या तुलनेत भारतातील स्थिती स्थिर आहे. जोपर्यंत होर्मुज खाडी पूर्णपणे खुली होणार नाही, तोवर एलपीजीचे संकट कायम राहणार आहे. घरगुती गॅसच्या किमतीमध्येही सरकारकडून मोठी वाढ केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. पण सध्या कमर्शियल एलपीजी गॅसच्याच किमतीत वाढ करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -