राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. पुढील काळात फार्मर आयडीशिवाय शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही
एवढेच काय तर खते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी दाखवावा लागणार आहे. मागील महिन्यापर्यंत १ कोटी ३२ लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहे.
राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार आहे. त्यानुसार अद्याप सुमारे ४० लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही. कृषि विभागाने या शेतकऱ्यांना त्यासाठी २० मेपर्यंतची मुदत दिली आहे. नोंदणी करण्यासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्रावर जाऊ शकतात. तसेच स्वतःही ॲग्रीस्टॅक पोर्टलवरून ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
फार्मर आयडी नोंदणी ने केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने २० मे २०२६ पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात १४ नोव्हेंबर २०२४ पासून ॲग्रीस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, १५ एप्रिल २०२५ पासून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार असून, त्यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. यापुढे कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच विविध बियाणे, खते, औषधे आदी मिळवण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना त्यापासून मुकावे लागू शकते.
पुणे विभागात सहाय्यक कृषी अधिकारी संगीता ननावरे (मो. क्र. ७५८८५०९४९२), नागपूर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९), कोकण विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८), अमरावती विभागात सहाय्यक कृषी अधिकारी अजितकुमार गेजगे (मो. क्र. ९६५७१०९८०९), छत्रपती संभाजीनगर विभागात सहाय्यक कृषी अधिकारी शीतल कौदरे (मो. क्र. ९१७२३१९६३७) आणि नाशिक विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सोनाली वाडेकर (मो. क्र. ९४०४९५३५१८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.



