10 वीच्या विद्यार्थ्यांना DigiLocker App मध्ये Digital गुणपत्रिका करता येणार सेव्ह
10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण वेबसाईटवर उपलब्ध होणार आहेत. तसेच या माहितीची प्रिंट आऊटही घेता येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना DigiLocker App मध्ये Digital गुणपत्रिका सेव्ह करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
कुठे पाहता येणार निकाल ?
10 वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या पोर्टल्सवर निकाल पाहू शकतील याची महाराष्ट्र बोर्डाने पुष्टी केली आहे.
दुपारी उपलब्ध होणार इयत्ता 10 वीचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता दहावीचा निकाल हा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज ( 8 मे) दुपारी उपलब्ध होणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आजच्या निकालाकडे लागलं आहे.



