Friday, May 8, 2026
Homeमहाराष्ट्रश्री स्वामी समर्थ तारक मंत्र ।। भीती, संकटांपासून मुक्तीसाठी प्रभावी स्वामींचा मंत्र...

श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ।। भीती, संकटांपासून मुक्तीसाठी प्रभावी स्वामींचा मंत्र !

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या वाक्याने मनाला खूप धीर येतो. स्वामी नेहमी भक्तांच्या हाकेला धावून येतात. केवळ स्वामींच्या नामजपाने स्वामी प्रसन्न होऊन आपल्या भक्तांवर कृपा करतात.

 

स्वामींची माहिती सांगणारा आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा एक प्रचंड प्रभावी असा तारक मंत्र आहे ज्याच्या पठणाने मनातील भीती व आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. हा तारक नागपूरचे निवासी व स्वामीभक्त विश्वनाथ दामोदर वऱ्हाडपांडे यांनी लिहिला आहे. तारक मंत्र नित्य पठणाने भक्तांना अनेक चमत्कारिक अनुभव आल्याचे पहायला मिळते. अनेकजण इच्छापूर्तीसाठी संकल्प घेऊन तारक मंत्र म्हणतात. तर काही भक्त नित्य याचा पाठ करतात. तारक मंत्र घरात नित्य वाचल्याने सकारात्मक व प्रसन्न वातावरण निर्माण होते. चला तर मग वाचूयात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रभावी तारक मंत्र मराठीतून.

 

।। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ।।

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना |

प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ||

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी |

अशक्य ही शक्य करतील स्वामी ||१||

 

जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय |

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||

आज्ञेविना काळ ही ना नेई त्याला |

परलोकी ही ना भीती तयाला ||२||

 

उगाची भितोसी भय हे पळू दे |

जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ||

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा |

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ||३||

 

खरा होई जागा श्रद्धेसहीत |

कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त ||

कितीदा दिला बोल त्यांनीच हात |

नको डगमगू स्वामी देतील साथ ||४||

 

विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ |

स्वामीच ह्या पंचप्राणामृतात ||

हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |

न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ||५||||

 

श्री स्वामी चरणविंदार्पणमस्तु |

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -