Monday, May 11, 2026
Homeमहाराष्ट्रविमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीची भडका, तब्बल 278 प्रवासी..

विमान लँडिंग करताना मोठी आग, थेट उडाला आगीची भडका, तब्बल 278 प्रवासी..

गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली. त्यामध्येच आता एक धक्कादायक घटना पुढे येत आहे. या घटनेने जगात हाहाकार उडाला. नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना तुर्किये एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागली. ही आग लागताच एकच खळबळ उडाली. ज्यावेळी आग लागली त्यावेळी विमानात तब्बल 278 प्रवासी आणि 11 विमान कर्मचारी होते. आग लागताच एकच गोंधळ उडाला. नियंत्रण कक्षाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळत सर्व प्रवाशांना सुखरूप सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या विमानाला आग लागताच एकच खळबळ उडाली. मात्र, आग नक्की कशी लागली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. या आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. आग काही वेळातच सर्वत्र पसरली.

 

विमानतळ सुरक्षा अधीक्षक राजकुमार सिलवाल यांनी एएनआयला फोनवरून बोलताना अपघाताबद्दल माहिती दिली. राजकुमार सिलवाल यांनी सांगितले की, तुर्कीश एअरलाइन्सचे विमान TK 726 इस्तंबूलहून काठमांडूला निघाले असता लँडिंग करताना त्याच्या टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग वाढण्यापूर्वीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

 

आगीवर नियंत्रण मिळवताच सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात संयुक्त राष्ट्रांच्या काही अधिकाऱ्यांसह 278 प्रवासी होते. यासोबतच 11 कर्मचारीही होते. सर्वजण सुखरूप आहेत. ज्यावेळी ही आग लागली त्यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले. मात्र, कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

 

या आगीच्या घटनेने विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता. काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, ही आग नक्की कशी लागली याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीये. विमानात तब्बल 278 प्रवासी होते. जर आग भडकली असती आण वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. आगी नक्की कशी लागली याचा तपास केला जात आहे. नक्की कुठे चूक झाली, याचा तपास हा केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -