मुंबई इंडियन्सचा 6 वि0998आयपीएल 2026 स्पर्धेत प्लेऑफसाठी चुरस आहे. पंजाब किंग्स आपल्या मोहिमेतील पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉपला होती. मात्र त्यानंतर पंजाबला उतरण लागली. पंजाबने सलग 4 सामने गमावले. त्यानंतर आता पंजाब आपल्या मोहिमेतील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करत आहे. मुंबई इंडियन्सचाही हा 12 वा सामना आहे. मुंबईचं प्लेऑफमधून आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबई प्रतिष्ठेसाठी खेळत आहे. मात्र पंजाबसाठी हा सामना प्लेऑफच्या समीकरणातून अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पंजाबसाठी एका अर्थाने हा सामना करो या मरो असाच आहे. या निमित्ताने सामन्यातील प्रत्येक अपडेट्स लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला नमवलं
आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 6 गडी राखून पराभूत केलं. पंजाब किंग्सने विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 19.5 षटकात मुंबई इंडियन्सने पूर्ण केलं. या पराभवामुळे पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित चुकलं आहे. सलग पाचवा पराभव झाल्याने आता उर्वरित दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे.
तिलक वर्माची अर्धशतकी खेळी
तिलक वर्माने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. षटकार मारला आणि अर्धशतक साजरं केलं. पण मुंबई इंडियन्सपासून विजय अजूनही दूर आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे.





