Saturday, May 16, 2026
Homeमहाराष्ट्रखेळता खेळता स्वराज कूलरजवळ गेला, शॉक लागून मृत्यू आईच्या डोळ्यादेखत १४ महिन्यांच्या...

खेळता खेळता स्वराज कूलरजवळ गेला, शॉक लागून मृत्यू आईच्या डोळ्यादेखत १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंत

तालुक्यातील शिरोली येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका अपघातात अवघ्या १४ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. कुलरच्या विद्युत प्रवाहाचा (shock) धक्का लागल्याने स्वराज सूरज उले (वय १४ महिने, रा. शिरोली) या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, (shock) गुरुवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान घरातील दैनंदिन कामकाज सुरू होते. स्वराजचे वडील, काका आणि आजोबा हे नेहमीप्रमाणे सकाळीच गावातील त्यांच्या हॉटेलमध्ये कामासाठी गेले होते. घरात आजी आणि काकू इतर घरगुती कामात व्यस्त होत्या.

 

तर स्वराजची आई घरासमोरील अंगणात सडा सारवण करत होती. याचवेळी चिमुकला स्वराज अंगणात खेळत होता. अंगणात ठेवून असलेला कुलर सुरू असल्याने त्याच्या लोखंडी स्टँडमध्ये विद्युत प्रवाह होता. (shock) खेळता खेळता स्वराज कुलरजवळ पोहोचला.निरागसपणे त्याने कुलरच्या लोखंडी स्टँडला हात लावताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. घटना लक्षात येताच तत्काळ विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. त्यानंतर स्वराजला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत्यू घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -