देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे.
अनेक शहरात पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०७ रुपयांवर पोहोचली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होताना दिसत आहे. इंधन दरवाढीनंतर आता मोबाईल रिचार्ज देखील महागण्याची शक्यता आहे.
मोबाइल नेटवर्क चालू ठेवण्यासाठी हजारो टॉवर कार्यरत असतात. टॉवर कार्यान्वित राहण्यासाठी वीज आणि डिझेल गरजेचे असते. रिपोर्टनुसार, मोबाईल टॉवरच्या ऑपरेटिंग खर्चापैकी ४० टक्के खर्च हा वीज आणि इंधनावर होतो. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे टॉवर कार्यरत ठेवण्यासाठीचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम कंपन्यांपुढे आता देशभर विस्तारलेले नेटवर्कचे काम कोणत्या व्यत्ययाशिवाय सुरू ठेवण्याचे आव्हान असणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात आजही अनेक टॉवर डिझेल जनरेटरवर अवलंबून आहे. इंधन दरवाढीमुळे त्याचा थेट परिणाम कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. रिपोर्टननुसार, टेलिकॉप कंपन्यांना डिझेलच्या खर्चासाठी दरवर्षी शेकडो रुपये खर्च करावे लागतात.
देशात एकीकडे 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने होत आहे. 5G टॉवरला जुन्या नेटवर्कच्या तुलनेत अधिक वीज लागते. या टॉवरला हाय-पॉवर लागते. त्यामुळे भविष्यात कंपन्यांचा ऑपरेशन खर्च वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक पुरवठा साखळीतही समस्यांमुळे टेलिकॉम कंपन्यांच्या सेक्टरमध्ये अडचणींमध्ये भर पडतोय. कंपन्या आता टॅरिफ वाढवण्याच्या विचारात आहे. वाढत्या महागाईमुळे येत्या महिन्यात युजर्सच्या कॉलिंग आणि डेटा प्लानच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर मोबाईलच्या रिचार्जमध्ये वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसण्याची शक्यता आहे.



