स्मार्टफोन वापरत असताना त्याला चार्जिंग असणं गरजेचं असतं. चार्जिंगच नसेल तर फोन काहीच कामाचा राहत नाही. अनेक लोक हे ओरिजिनल फास्ट चार्जिंग वापरत असतात. पण तरीही त्यांच्या फोनला वेगाने चार्जिंग होत नाही.
मग लोक याचा दोष चार्जर, केबल किंवा बॅटरीला देतात. पण खरं कारण फोनमधील एक खास सेटिंग असू शकते.
या फीचरचं नाव Adaptive Charging असं आहे. ही सेटिंग सध्याच्या अनेक आधुनिक अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये दिली जाते. याचा हेतू बॅटरीची लाइफ वाढवणे असतो. खरंतर अनेकदा हे फीचर फोनची चार्जिंग स्पीड खुप स्लो करते.
Adaptive Charging म्हणजे काय?
Adaptive Charging एक स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट फीचर आहे. याचं काम फोन प्रत्येक वेळी फूल स्पीडमध्ये चार्ज करण्याऐवजी यूझरची सवय समजून चार्जिंग कंट्रोल करणे आहे. समजा तुम्ही रोज रात्री 11 वाजता फोन चार्जिंगला लावला आणि सकाळी 7 वाजता काढला. तर अशावेळी फोन जवळपास 80 टक्केपर्यंत लवकर चार्ज होऊन थांबतो. मग हळुहळू सकाळच्या वेळी 100 टक्केपर्यंत पोहोचतो. या टेक्नॉलॉजीचा हेतू बॅटरीवरील दबाव आणि उष्णता कमी करणए आहे. जेणेकरुन दीर्घकाळपर्यंत बॅटरीची हेल्थ चांगली राहील.
फोन खराब झाला असं लोकांना का वाटतं?
ज्यावेळी फोन अचानक हळुहळू चार्ज होतो. तेव्हा जास्तीत जास्त यूझर्सला वाटतं की, त्यांचं फास्ट चार्जर खराब झालंय किंवा मग केबलमध्ये प्रॉब्लम आलाय. तर अनेक प्रकरणांमध्ये Adaptive Charging याचं सर्वात मोठं कारण असतं. कारण हे फीचर जाणिवपूर्वक चार्जिंग स्पीड कमी करते. यामुळे यूझर्सला वाटतं की, फोनमध्ये काही तरी टेक्निकल प्रॉब्लम आलाय.
अशी चेक करा सेटिंग
तुमचा फोन सामान्यापेक्षाही जास्त हळू चार्ज होत असेल तर एकदा Adaptive Charging सेटिंग अवश्य तपासून पाहा. जास्तीत जास्त Android स्मार्टफोन्समध्ये हा ऑप्शन मिळतो.
Settings > Battery > Adaptive Charging
किंवा
Settings > Battery Health > Charging Optimisation
तुम्ही हे फीचर बंद केलं तर अनेक प्रकरणांमध्ये फोन लगेच पहिल्यासारखी फास्ट चाईजिंग स्पीडवर परतते.
हे नेहमीसाठी बंद करणं योग्य आहे का?
विशेषज्ञ म्हणतात की, Adaptive Charging पूर्णपणे बंद करणं दीर्घकाळात बॅटरीच्या लाइफवर परिणाम करते. खरंतर बॅटरी दीर्घकाळपर्यंत 100 टक्के चार्ज राहते. तेव्हा त्याची क्षमता हळुहळू कमी होते. याच कारणामुळे कंपनी या फीचरला डिफॉल्टरित्या चालू ठेवते.
हे फीचर कंपन्या का देतात?
अनेक लोक आपल्या स्मार्टफोनचा वर्षानुवर्षे वापर करतात. अशावेळी कंपन्यांवर बॅटरीची लाइफ चांगली ठेवण्याचा दबाव वाढलाय. लिथियम-आयन बॅटरी लवकर खराब होण्याचं सर्वात मोठं कारण जास्त उष्णता मानलं जातं.
याच कारणामुळे Android कंपन्या सॉफ्टवेयर आधारित चार्जिंग सिस्टमचा वापर करत आहेत. जेणेकरुन बॅटरी कमी गरम होईल आणि तिचं आयुष्य वाढू शकेल. काही नवीन अँड्रॉइड व्हर्जनमध्ये असे स्मार्टफोन सिस्टमही टेस्ट केले आहेत. जे फास्ट चार्जिंग आणि बॅटरी सुरक्षेमध्ये संतुलन बनवू शकतील.
नवीन चार्जर खरेदी करण्यापूर्वी हे आधी पाहा
तुमचा स्मार्टफोन अचानक हळुहळू चार्ज होत असेल तर लगेच नवीन चार्जर किंवा केबल खरेदी करण्याची गरज नाही. पहिले तपासा की Adaptive Charging फीचर चालू तर नाही. कदाचित तुमचा फोन खराब नसेल. ते फक्त बॅटरी सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असेल.

