Thursday, May 21, 2026
Homeक्रीडाकोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आव्हान कायम

कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आव्हान कायम

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 65 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये करण्यात आलं होतं. होम टीम केकेआरने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपली आशा कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. मुंबई इंडियन्सने केकेआरसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरने हे विजयी आव्हान 6 विकेट्स गमावून 18.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. केकेआरचा हा या मोसमातील सहावा आणि मुंबई विरुद्धचा पहिला विजय ठरला. केकेआरने या विजयासह मुंबईचाही हिशोब चुकता केला. मुंबईने याआधी 30 मार्च 2026 रोजी केकेआरला पराभूत केलं होतं. आता केकेआरने हा सामना जिंकून मुंबईने केलेल्या पराभवाची परतफेड केली आहे.

 

कोलकाताचा मुंबई विरुद्ध 4 विकेट्सने विजय, केकेआरचं आवहान कायम

कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात इडन्स गार्डन्समध्ये आयपीएल स्पर्धेच्या 64 व्या सामन्यात मुंबई इंडियन विरुद्ध 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. केकेआरने यासह 2 गुणांची कमाई केली आहे. मुंबईने विजयासाठी दिलेलं 148 धावांचं आव्हान केकेआरने 18.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. केकेआरने यासह प्लेऑफमधील आपली आशा कायम ठेवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -