Saturday, May 23, 2026
Homeमहाराष्ट्रIPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

IPL 2026 प्लेऑफपूर्वी आरसीबीसाठी आनंदाची बातमी, झालं असं की…

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना आरसीबी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. हैदराबादकडून मोठ्या फरकाने पराभव झाला तरी दुसऱ्या स्थानावर आरसीबी कायम राहिल. त्यामुळे टॉप 2 मधील स्थान पक्कं असल्याने पहिला क्वॉलिफायर सामना खेळणं जवळपास निश्चित आहे.

 

आरसीबीचं प्लेऑफ आणि त्यातही क्वॉलिफायर 1 खेळण्याचं स्थान पक्कं आहे. आता असं असताना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. आता संघात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री होणार आहे. फिल सॉल्ट प्लेऑफपूर्वी आरसीबी संघात सहभागी होईल.

 

18 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना फिल सॉल्टच्या डाव्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला इंग्लंडला जावं लागलं होतं. आता पूर्णपणे बरा झाला असून आरसीबी संघात संघात सहभागी होण्यास सज्ज झाला आहे

 

फिल सॉल्ट 26 मे पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सहभागी होईल. त्यामुळे आरसीबीचा संघ आणखी मजबूत होणार आहे. कारण आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळलेल्या सहा सामन्यात फिल सॉल्टने 2 अर्धशतकांसह 206 धावा केल्या होत्या.

 

फिल सॉल्टच्या गैरहजेरीत आरसीबीकडून सात सामन्यात जेकब बेथेलने फलंदाजी केली. पण त्याने फक्त 96 धावा केल्या. अर्थात सॉल्टच्या गैरहजेरीत आरसीबीला चांगली सुरूवात मिळाली नाही. आता महत्त्वाच्या टप्प्यात सॉल्ट येणार असल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -