Wednesday, May 27, 2026
Homeक्रीडाकर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयपीएलमध्ये मोडला मोठा विक्रम

कर्णधार म्हणून रजत पाटीदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, आयपीएलमध्ये मोडला मोठा विक्रम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने आयपीएल 2026 स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 93 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे

 

रजत पाटीदारने गुजरात टायटन्सविरुद्ध 9 षटकार मारले. यासह आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. रजत पाटीदारने आतापर्यंत 41 षटकार मारले आहेत.

 

रजत पाटीदारने श्रेयस अय्यरचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये 39 षटकार मारले होते. पाटीदार या पर्वात अय्यरला धावांच्या बाबतीत मागे टाकेल अशी स्थिती आहे. पाटीदाराने 14 सामन्यात 486 धावा केल्या आहेत. तर अय्यरने या पर्वात 498 धावा केल्या आहेत.

 

रजत पाटीदार या पर्वात सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा करणारा कर्णधार ठरला आहे. त्याचा स्ट्राईक रेट हा 196 पेक्षा अधिक आहे. पाटीदारने या पर्वात 5 अर्धशतकं ठोकली आहेत. पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबी सलग दुसऱ्यांदा जेतेपद मिळवू शकतो

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -