राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णता कमी झाली. मात्र, आता वादळी वाऱ्यासह गारपिटीचा मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला. आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. थेट गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. मॉन्सून लवकरच राज्यात दाखल होईल. त्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले. अनेक राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. या पावसामुळे मोठा दिलासा लोकांना मिळाला. उष्णतेने लोक हैराण झाली होती. पावसासह गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला.
राज्यात मागील काही महिन्यात देखील मोठी गारपिट झाली. ज्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये आजही परत गारपिटीचा इशारा देण्यात आला. सातारा जिल्ह्यात अचानक हवामानात बदल झाला. वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची दमदार हजेरी. कर्जत तालुक्यात मिरजगावमध्ये देखील पावसाची हजेरी. प्रचंड उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा. खरीपपूर्व मशागतीसाठी पाऊस लाभदायक शेतजमिनीत काही प्रमाणात ओलाव्याची शक्यता. मात्र काढणी केलेला कांदा, भाजीपाला उघड्यावरील कृषी मालाला फटका बसण्याची शक्यता. जळगावच्या चाळीसगाव आणि भडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भडगाव तालुक्यातील गुढे-जुवार्डी आणि आडळसे परिसरात गारपिट ; पिकांच्या नुकसानीची शक्यता.
सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. आजही पाऊस होणार आहे. मात्र, आज पावसासह गारपिटीची इशारा देण्यात आला. पुढील 24 तासाकरिता हा इशारा देण्यात आला. राज्यातील हवामानात मोठा बदल झाला. उष्णतेपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. गारपिटीसह पाऊस होईल.





