बॉलिवुड अभिनेता सलमान खान त्याच्या कुटुंबाप्रमाणे त्याच्या मित्रांची देखील काळजी घेत असतो. मित्रांच्या सुख आणि दु:खाच्या प्रसंगात तो त्यांना आधार देत उभा रहात असते. आता सलमान खान याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सलमान खूपच दु:खी दिसत आहे. वास्तविक त्यांची कौटुंबिक मैत्रिणी कुमुद राणे हिचे निधन झाले आहे. त्यामुळे सलमान याला अतिव दु:ख झाले. सलमान त्याच्या मैत्रिणीला अंतिम निरोप देण्यासाठी पोहचला आणि त्यावेळी त्यांच्या भावनांना आवर घालताना त्याला खुप त्रास झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की सलमान कुमुदच्या निधनाने खचलेला दिसला. कुमुद राणे यांचे पती देखील सलमानचे जिवलग मित्र आहेत. त्यांचे नाव जग्गी राणे असे आहे. कुमुद एक हेअरस्टायलिस्ट होत्या. मुंबईच्या वांद्रे भागातच त्यांचे सलुन आहे. कुमुद या कॅन्सरशी लढत होत्या. त्याची संघर्ष अखेर संपला आहे. केवल सलमानच नाही तर अरबाझ खान, सोहेल खान, त्यांची आई सलमा आणि हेलन, सोहेलची मुले निर्वाण आणि अरबाझ खानचा मुलगा अरहान देखील कुमुदच्या अंत्यदर्शनाला आले होते.







