Homeमहाराष्ट्रगायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी

गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी

प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील ही घटना असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जिम परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत बिष्णोई गँगने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

 

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये बिष्णोई गँगमधील एक गुंड म्हणतोय, “अभिनेता सलमान खानसोबतच्या जवळच्या संबंधांमुळे गुरू रंधावाला लक्ष्य करण्यात आलं आहे. हा फक्त ट्रेलर आहे.” या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी गुरू रंधावाच्या जिमच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. हे कृत्य खरोखरच एखाद्या टोळीचं आहे की कोणीतरी दहशत पसरवण्यासाठी बिष्णोईच्या नावाचा वापर करत आहे, हे निश्चित करण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -