कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळी नऊ वाजता जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर गडहिंग्लज येथील पर्यायी पुलाचा भाग खचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने शिंगणापूर बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे.
गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव येथील नवीन पुलाचे काम चालू असल्याने वाहतुकीकरिता पर्यायी पूल केला होता. परंतु नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढत चालल्यामुळे व पर्यायी पुलाचा काही भाग खचल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पर्यायीपुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. बॅरिगेटिंग व फ्लेक्स लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. (Gadhinglaj) त्या ठिकाणी कर्मचारी देखील ठेवण्यात आलेले आहे . त्यामुळे गडहिंग्लज कडून चंदगडकडे जाणारी वाहतूक आजरा, गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. पावसाचा वेग वाढल्याने नदी धरणातील पाणी पातळी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली कोल्हापूर पद्धतीचा रुई, शिंगणापूर, शिरोळ , यवलुज बंधारे आज सकाळी ९ पर्यंत पाण्याखाली गेले आहेत.
गेल्या तीन – चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पावसाच्या या सरींमुळे जिल्ह्याचे जनजीवन सुखद झाले असून बळीराजा सुखावला आहे. संपूर्ण जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला आहे. दुसरीकडे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासांत सुमारे चार फुटाने वाढ झाली आहे. (Gadhinglaj) अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पंचगंगा नदीसह वारणा, दुधगंगा आणि वेदगंगा नद्यांचे पाणी वाढत चालले आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी काल १०.५ दहा फूट इतके होती. ती आज सायंकाळी १३.५ फूट इतकी होती. गेल्या २४ तासात सुमारे चार फूट पाणी पातळी वाढली आहे.
रविवारपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव, घटप्रभा, सर्फनाला, कोदे या धरण क्षेत्रांत दमदार पाऊस झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला रविवार पर्यंत पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.शेती कामांना गती जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. (Gadhinglaj) आता पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी शेती कामांत व्यस्त आहेत. पावसाच्या पाण्यामुळे जमिनीला ओलावा मिळाल्याने पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.





