आषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर नंदवाळ येथील पायी दिंडी, रिंगण सोहळ्यासह दर्शनासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) शहर वाहतूक शाखेने वाहतूक मार्गात बदल केला असून कोल्हापूरातून राधानगरीमार्गे कोकणात जाणारी व येणारी वाहतूक कळंबा इस्पुर्ली मार्गे वळविण्यात येणार आहे. शनिवारी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत हा बदल राहणार आहे.
वाहतूक वळवलेले मार्ग
कोल्हापूर-राधानगरीमार्गे कोकणात जाणार्या व येणार्या एसटी, अवजड वाहने कळंबा-इस्पुर्ली -शेळेवाडी-परिते फाटा-भोगावतीमार्गे वळविली आहे.
कोल्हापूर ते राधानगरी जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी, सर्व वाहने रिंगण सोहळा होऊन दिंडी नंदवाळकडे मार्गस्थ होईपर्यंत कोल्हापूर-भोगावती रोड तात्पुरत्या स्वरूपात बंद राहील.
रिंगण सोहळ्या दरम्यान एकेरी मार्ग
कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणारी वाहने हॉटेल रेडवुड येथून डावीकडे वळण घेऊन जिवबा नाना शेवट बस स्टॉपमार्गे पुढे पिरवाडी, तंदूर हॉटेलमार्गे मार्गस्थ होतील. राधानगरीकडून येणारी वाहने संकल्प सिद्धी कार्यालयाच्या डाव्या बाजूने फुलेवाडी रिंग रोडमार्गे मार्गस्थ होतील.
वाहतुकीसाठी बंद केलेले मार्ग
वाशी नंदवाळ फाटा ते नंदवाळ गावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरिता नंदवाळ फाटा येथे बंद.
जैताळ फाटा ते नंदवाळ गावी जाणारा मार्ग सर्व वाहनांकरिता जैताळ फाटा येथे बंद.
भीमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळ गावी
जाणारा मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद
तंदूर हॉटेल ते संकल्पसिद्धी मार्ग रिंगण सोहळा कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
पार्किंग ठिकाण
खत कारखाना (वाशी) गिरगाव फाटा, चोरगे महाविद्यालय,
पुईखडी पाण्याची टाकीचे जवळ व बाजूस
नो पार्किंग
अंबाजी खामकर गृहनिर्माण संस्था ते हॉटेल तंदूर कॉर्नर, वाशी पेट्रोल पंप (हजारे पंप) ते खत कारखाना ओढ्यापर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग
आपत्कालीन मार्ग
नंदवाळ विठ्ठल मंदिर ते जैताळ (फाटा) हा मार्ग आपत्कालीन व्यवस्थेसाठी ठेवला आहे.



