Homeमहाराष्ट्रवाढदिवसाच्या आनंदावर नियतीचा घाला, 3 वर्षीय चिमुकलीचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू

वाढदिवसाच्या आनंदावर नियतीचा घाला, 3 वर्षीय चिमुकलीचा हौदात पडून दुर्दैवी मृत्यू

जळगावच्या नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात आज घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अवघ्या तीन वर्षांची कुमारी आकांक्षा प्रवीण इंगळे हिचा राहत्या घराच्या समोरील पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

 

काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस आनंदात साजरा करण्यात आला होता. मात्र, त्या आनंदावर नियतीने क्षणार्धात दुःखाची छाया पसरवली.

 

घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले असताना आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळण्याच्या नादात तिचा पाय घसरला आणि ती घरातील पाण्याच्या हौदात पडली. बराच वेळ ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

 

आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. यंदाच १ जुलै रोजी तिचा तिसरा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच या चिमुकलीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण भवानीनगर परिसर सुन्न झाला आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -