भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि प्रसिद्ध अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आकृती अग्रवाल (Akriti Agarwal) यांच्या खासगी आयुष्याबाबत सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहेत.
मार्च २०२६ मध्ये या जोडीने थाटामाटात साखरपुडा (Engagement) केला होता. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच जुलै २०२६ मध्ये त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. आकृती अग्रवालने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या एका गूढ आणि भावनिक स्टोरीमुळे (Instagram Story) या अफवांना सुरुवात झाली आहे.
आकृतीच्या इन्स्टाग्राम स्टोरीने वेधले लक्ष –
आकृतीने आपल्या स्टोरीमध्ये लिहिले की, “माझ्यासोबत अनेक वेळा विश्वासघात झाला, पण मी कधीच एक शब्दही बोलले नाही. एक पाऊल पुढे टाकल्यानंतरही आज हे सगळं घडेल, यावर अजूनही विश्वास बसत नाही.” यानंतर तिने दुसऱ्या स्टोरीमध्ये म्हटले, “सगळं खरं आहे. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल जे काही पाहत आहात, त्या सर्व अफवा खऱ्या आहेत.” जरी या पोस्टमध्ये आकृतीने थेट कोणाचेही नाव घेतले नसले, तरी नेटिझन्सनी याचा थेट संबंध पृथ्वी शॉशी जोडत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू केल्या आहेत.
अनफॉलो केल्याचा दावा खोटा; काय आहे सत्य?
या वादानंतर सोशल मीडियावर काहींनी असा दावा केला की, दोघांनी एकमेकांना अनफॉलो केले असून साखरपुड्याचे फोटोही डिलीट केले आहेत. मात्र, या वृत्ताची पडताळणी केली असता हे सर्व दावे तथ्यहीन आणि चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृथ्वी आणि आकृती अद्यापही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत असून त्यांच्या प्रोफाइलवर साखरपुड्याचे फोटो जसेच्या तसे आहेत. त्यामुळे नात्यात दुरावा आल्याचे वृत्त सध्या केवळ अफवा असल्याचे दिसून येते.
क्रिकेट कारकिर्दीतही पृथ्वी शॉचा कठीण काळ –
एकीकडे वैयक्तिक आयुष्याची चर्चा असताना, दुसरीकडे पृथ्वीची क्रिकेट कारकीर्दही धोक्यात आली आहे. २०२१ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळलेल्या पृथ्वीला गेल्या ५ वर्षांत संघात स्थान मिळालेले नाही. आयपीएल २०२५ च्या लिलावात तो अनसोल्ड राहिला होता. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला संघात घेतले खरे, पण संपूर्ण हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर पृथ्वी सध्या कठीण टप्प्यातून जात आहे.



