Homeमहाराष्ट्रमद्यप्रेमींना मोठा झटका? दारूच्या किमतीत वाढ होणार; जाणून घ्या कोणत्या शहरात काय...

मद्यप्रेमींना मोठा झटका? दारूच्या किमतीत वाढ होणार; जाणून घ्या कोणत्या शहरात काय रेट्स?

मद्यप्रेमींना एक झटका लागणार आहे. सरकारने दारुच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयामुळे नेमक्या किती रुपयांनी किंमती वाढणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये या किमती लागून होणार आहेत. सविस्तर समजून घेऊयात.

सोमवारी चेन्नई येथील सचिवालयात, मद्यनिषेध आणि उत्पादन शुल्क मंत्री के. विग्नेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाच्या (Tasmac) संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. या आठवड्यापासून तुम्हाला प्रति बाटली अधिक पैसे मोजावे लागू शकतात.

 

प्रति बाटली दरात किती वाढ होणार?

 

असे वृत्त आहे की, तामिळनाडूच्या मद्यप्रेमींना हा मोठा दणका बसणार आहे. सामान्य आणि मध्यम श्रेणीच्या ब्रँड्सच्या दरात प्रति बाटली १०-२० रुपयांची वाढ होणार आहे. प्रीमियम आणि विदेशी दारूच्या (IMFL) दरात प्रति बाटली ३०-५० रुपयांची वाढ होईल. त्याचप्रमाणे, बिअरच्या दरातही प्रति बाटली १० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

मात्र, अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. राज्यात दारूच्या दरात शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०२४ रोजी झाला होता, जेव्हा सरकारने विविध दारू ब्रँड्सच्या दरात १० ते ८० रुपयांनी वाढ केली होती. जर या दरवाढीला मंजुरी मिळाली, तर दोन वर्षांहून अधिक काळातील हा पहिलाच दरबदल असेल.

 

किमती का वाढवल्या जाताहेत?

 

सरकारने अलीकडेच शाळा आणि महाविद्यालये यांसारख्या शैक्षणिक संस्था, बसस्थानके आणि मंदिरांजवळील ७१७ टॅस्मॅक किरकोळ विक्री केंद्रे बंद केली आहेत. यामुळे सरकारी महसुलात लक्षणीय घट झाली आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी सरकार दर वाढवण्याचा प्रयत्न करत असण्याची शक्यता आहे.

 

राज्याला मिळणार अतिरिक्ट महसूल

 

‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’मधील एका वृत्तानुसार, टॅस्मॅकच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्याला IMFL उत्पादने आणि बिअरचा पुरवठा करणाऱ्या मद्य उत्पादकांवर अलीकडेच उत्पादन उपकर लावण्यात आला आहे. या करातून सरकारला दरवर्षी अंदाजे ६,००० ते १०,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. दरम्यान, वाढते कर आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे मद्य कंपन्यांनीही सरकारला खरेदी दर वाढवण्याची मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -