Monday, April 22, 2024
Homeकोल्हापूरउच्चशिक्षित तरुणी ची नैराश्यातून आत्महत्या

उच्चशिक्षित तरुणी ची नैराश्यातून आत्महत्या


प्रतिभानगर, सम्राटनगर येथील प्रीती प्रशांत जैन (वय 22) या तरुणीने बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. उच्चशिक्षित तरुणी ने अनपेक्षितपणे जीवनाचा शेवट करून घेतल्याने आई, भावासह नातेवाईकांना धक्का बसला. राजारामपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
तरुणीच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर आई, भावाने कष्टातून तिचे शिक्षण पूर्ण केले. आठवड्यापूर्वी दुबईस्थित कंपनीत तिला मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर आली. शनिवारी (दि. 4) तिला ड्युटीच्या ठिकाणी हजर व्हायचे होते. तथापि, विमान चुकल्याने तरुणी कोल्हापूरला परतली. मंगळवारी (दि. 7) मुंबईतून दुबई विमान प्रवास निश्चित झाला होता.

मुलगी सायंकाळी मुंबईला रवाना होणार असल्याने आई, भावाने दुपारी एकत्रित जेवण केले. नातवाईकांनीही तिचे तोंडभरून कौतुक केले. जेवण आटोपल्यानंतर आई, भाऊ तरुणीचे साहित्य आवरत होते. या काळात प्रीती दुसर्या मजल्यावर बेडरूममध्ये गेली. दहा-पंधरा मिनिटांनंतरही ती खाली न आल्याने आईने तिला हाका मारल्या. कोणताच प्रतिसाद येत नव्हता.

भावाने बेडरूमकडे धाव घेतल्यानंतर तरुणीने लोखंडी हुकला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. गळफास सोडवून तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत वडिलांच्या पश्चात शिक्षणासाठी आईला त्रास झाला.
आत्महत्येप्रकरणी कोणाला जबाबदार धरू नका, कोणाला त्रास देऊ नका, असेही म्हटले आहे. केवळ नैराश्यातून उच्चशिक्षित तरुणी ने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -