Homeइचलकरंजीइचलकरंजीच्या रेल्वेसाठी जनआंदोलन उभारणार

इचलकरंजीच्या रेल्वेसाठी जनआंदोलन उभारणार

इचलकरंजीचे विद्यमान खासदार आणि आमदार या दोन्हीही लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेली रेल्वे अद्यापही रखडलेली आहे. देशात वस्त्रोद्योगाच्या निमित्ताने नावारुपास आलेल्या वस्त्रनगरी इचलकरंजीची मंजूर झालेली रेल्वे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी, यासाठी जनआंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे कृती समितीचे नियंत्रक निमंत्रक अजय जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

 

ते म्हणाले, सन २०१७ मध्ये इचलकरंजी-हातकणंगले या रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूरी दिली होती, त्याचे स्वतंत्र

 

हेडसुध्दा तयार करून १२ कोटी रुपयांचा निधी खात्यावर शिल्लक आहे. वर्षाला तब्बल ५ हजार कोटी रुपये जीएसटीच्या स्पाने इचलकरंजीतून शासनाला महसूल दिला जातो. इचलकरंजीकरांना हातकलंगले कोल्हापूर अथवा मिरज याठिकाणी जावे लागते.

 

दोन दिवसांपूर्वी पुणे येथे नियोजित रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत इचलकरंजी-हातकणंगले हा रेल्वे मार्ग रद्द करण्यात आल्याची माहिती दिल्याचे समजून येते. जनतेतूर या प्रश्नी उठाव होण्यासाठी रण्याटप्प्याने आंदोलन हाती घेतले जाईल, असेही जाधव यांनी सांगितले. यावेळी रमेश शर्मा, नंदु बांगड, धर्मराज जाधव, मारुती पाटील, पांडुरंग पिसे, मनोहर जोशी, संदीप ठोके, विकी लोकरे, अशोक पाटणी, बाळकृष्ण तोतला आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -