मजरे कासारवाड्यातील युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू

दसर्‍यानिमित्त घराची साफसफाई करत असताना विजेच्या तारेचा स्पर्श होऊन एका यूवकाचा मूत्यू झाला.

श्रीराज अशोक वारके (वय-२८, रा. मजरे कासारवाडा, ता. राधानगरी ) असे त्याचे नाव आहे. माजी सरपंच अशोक वारके यांचा तो मुलगा आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
तो दसर्‍याच्या सणानिमित्त आपल्या घराची साफसफाई करत असताना त्याचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला नातेवाईक पुढील उपचारासाठी खासगी हाॅस्पिटलला घेऊन जात असतानाच त्याचा मूत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *