येथील दत्त मंदिर तब्बल ११ दिवसांनी दर्शनासाठी खुले झाले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत (Nrusinhawadi Datta Temple darshan after flood) आहे. पुराचे पाणी ओसरल्याने मंदिर प्रशासनाकडून परिसरात चिखल बाजूला करून स्वच्छता करण्यात येत आहे.
३० जुलैला दुसरा दक्षिणद्वार सोहळा झाल्यानंतर मंदिर पाण्याखाली गेले होते.
मुख्य मंदिरात दर्शन बंद करून नारायणस्वामी मठात ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती ठेवली होती. तिथेच पूजेचे नित्यक्रम पार पडत होते. अकरा दिवसांनंतर मुख्य मंदिरात दत्तगुरूंचे दर्शन घेता येत असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची पावले पुन्हा येथे वळत आहेत. पुरामुळे ठप्प झालेली दुकानेही पूर्ववत सुरू झाली आहेत.
पूर नियंत्रणासाठी उपाययोजना आवश्यक
दरवर्षी पावसाळ्यात नृसिंहवाडीला पुराचा फटका बसतो. हिप्परगी व आलमट्टी धरणांच्या पाणी विसर्गाचे योग्य नियोजन न झाल्यास या तीर्थक्षेत्राला पुराचा वेढा पडतो. यामुळे ११-१२ दिवस दत्तमंदिर पाण्याखाली जात असल्याने प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,


