Homeयोजनानोकरीदेशातील सर्वात मोठी बँक १२ हजार कर्मचारी भरणार, २५० शाखा उभारणार

देशातील सर्वात मोठी बँक १२ हजार कर्मचारी भरणार, २५० शाखा उभारणार

बेकारीने त्रस्त असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशाची सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेच तसेच या आर्थिक वर्षांत २५० शाखांचे नेटवर्क उभारण्याचे आपले उद्दीष्ठ असल्याचे सीबीआयचे चेअरमन सी. एस. शेट्टी यांनी सांगितले आहे. या आर्थिक वर्षात क्लेरिकल आणि ऑफीसर केडरची एकूण ११ ते १२ हजार कर्मचारी भरणार असल्याचे सी.एस.शेट्टी यांनी सांगितले आहे. निवृत्ती आणि नव्याने उद्भवणाऱ्या गरजांनुसार कर्मचाऱ्यांची संख्या बदलू शकते, वर्षाच्या अखेरीस आपण सुमारे १२,००० भरती पूर्ण करू, अशी मला अपेक्षा आहे,” असे त्यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना म्हटले आहे.

 

गेल्यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर भरती केली असून त्यात १,५०० स्पेशलिस्ट आयटी अधिकाऱ्यांची भरती केली आहे. यावर्षी आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावर आयटी कर्मचारी ( information technology ) भरण्याची गरज नाही असेही त्यांनी म्हटले आहे. आताच्या मार्च २०२६ च्या अखेर २.४५ लाख कर्मचाऱ्यांचा वर्कफोर्स झाला आहे. एसआयबी ही भारताची सर्वाधिक नोकरी देणारी संस्था ठरली आहे.

 

एकूण २५,६३३ कर्मचारी भरले

एसबीआयकडे ४,६४० अधिकारी, १९,३४० सहायक अधिकारी आणि १,६५३ कंत्राटी स्टाफ साल २०२५-२६ या आर्थिक वर्षात आहे. असे एकूण २५,६३३ कर्मचारी गेल्या वर्षी नोकरीवर घेतल्याचे बँकेच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. बँक शाखांचा विस्ताराबद्दल बोलताना शेट्टी यांनी सांगितले की इतके मोठे नेटवर्क असतानाही काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची जागा भरणे शिल्लक आहे. नवीन वसाहती विकसित होणे असणे असो किंवा व्यावसायिकदृष्ट्या सक्रिय भाग असोत, अशा ठिकाणी बँकेचा विस्तार नीट करण्यासाठी ही नवीन भरती कामी येईल असे म्हटले जात आहे. आम्ही काही बँक शाखांचे रॅशनलायईज करण्याचा विचार करत आहोत, याचा अर्थ आमची कर्मचारी संख्या दरवर्षी २०० ते २५० पर्यंत वाढेल,” असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -