Homeइचलकरंजीशहापूर सायझिंगच्या छतावरुन पडून कामगाराचा मृत्यू

शहापूर सायझिंगच्या छतावरुन पडून कामगाराचा मृत्यू

येथील खजिरे औद्योगिक वसाहतीमधील अमोल सायझर्समध्ये स्वच्छता करताना छतावरुन पडून विगारी कामगाराचा मृत्यू झाला. विकास विष्णु रसणे (वय ३२, रा. मलाबादेनगर, शहापुर) असे त्याचे नाव आहे. शहापुर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

 

खजिले औद्योगिक वसाहतीत चंद्रकांत आगमकर यांची अमोल सायझर्स नामक सायझिंग आहे. या सायद्विगमध्ये बुधवारी सकाळी विकास रसणे हा स्वच्छतेचे काम विचारण्यासाठी गेला होता. संबंधित व्यवस्थापनाने दुपारी स्वच्छतेचे काम करण्यास त्याला सांगितले होते. त्यानुसार दुपारी छतावर बदन स्वच्छता करत असतारा तोल जावून ती साथद्विगमधील बिमावर पडला. यामुळे मोठा आवाज झाल्याने सायझिंगमधील कामगार आवाजाच्या दिशेने धावले असता रसणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि तो बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिका-यांनी सांगितले. याबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. शहापुर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -