Homeइचलकरंजीकृष्णा योजनेची वितरण नलिका बदलण्यात अडचणी श्री शिवतीर्थ परिसर जलमय; नागरिकांना नाहक...

कृष्णा योजनेची वितरण नलिका बदलण्यात अडचणी श्री शिवतीर्थ परिसर जलमय; नागरिकांना नाहक त्रास

येथील श्री शिवतीर्थ परिसरात कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन बदलण्याच्या कामात मोठा अडथळा येत आहे. कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर जमिनीमध्ये साचलेले पाणी लाखो लिटर पाणी मोटर लावून काढण्याची वेळ कर्मचाऱ्यावर आली आहे.

 

पाण्यामुळे काम करताना कामगारांना अडचणींचा सामना करावा लागला.

 

इचलकरंजी शहराला मजरेवाडी येथील कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेतून तसेच पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेची वितरण नलिका कालबाह्य झाल्यामुळे सदर वितरण नलिकेला वारंवार गळती लागते. त्यामुळे सदरची पाईपलाईन बदलण्याचे काम घेण्यात काही वर्षापासून सुरू आहे. बदलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या श्री शिवतीर्थ परिसरात नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. पाईपलाईन साठी खुदाई करताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा मिळून येत आहे. त्यामुळे पाईपलाईन बदलण्यात अनंत अडचणी बेत आहेत. जमिनीखाली साठलेले पाणी बाहेर काढण्यासाठी अक्षरशा दहा एय. पी. ची मोटर लाबाबी लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ठारेची कसरत करावी लागत आहे.

 

जमिनीखाली साचलेले पाणी गळतीमुळे आहे की अन्य ठिकाणाहून बाची पाहणी करण्याबरोबरच या परिसरात सन्याखाली मुरूम असल्याने पाणी बाहेर काढत्याशिवाय काम करताना अडचणी येत आहेत. या अडचणी दूर करून काम करत असल्याचे महानगरपालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.

 

शिवतीर्थ परिसर जलमय

 

श्री शिवतीर्थ परिसरात रस्त्याची खुदाई करून पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सदरचे पाणी मोटर लावून काढत असल्याने सदर परिसर जलमय होऊन मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना तसेच पादवान्यांना कसरत करावी लागत आहे.

 

मोटर लावून पाणी उपसा करत असल्यामुळे शिवतीर्थ परिसर जलमय झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -