Homeइचलकरंजीचारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोघांना मारहाण पतीसह दोघांवर गुन्हा

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह दोघांना मारहाण पतीसह दोघांवर गुन्हा

चारुित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या माहेरी घरात घुसून शिवीगाळ करत पतीने केलेल्या बेदम मारहाणीत तिघेजण जखमी झाले. या प्रकरणी स्वप्निल रंगराव माने (वय २७) व सिताराम परसु माने (वय ६० दोघे रा. इंदिरानगर कोरोची) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्राजक्ता स्वप्निल माने (वय २६ रा. इंदिरानगर कोरोची) हिने शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

बाबाचत मिळालेली माहिती अशी, प्राजक्ता माने ही माहेरी असताना १० नोव्हेंबर रोजी पती स्वप्निल माने याने चारित्र्याच्या संशयावरुन तिला अर्वाच्च शिवीगाळ करत वाद सुरु केला. त्यावेळी प्राजक्ताचा मामेभाऊ आमन हेगड़े बाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास स्वप्निल माने व सिताराम माने हे दोघे पाठीमागील दरवाजाचा कड़ी तोडून घरात घुसले. दोघांनी काठीने प्राजक्ता, तिची आई विजया चंद्रकांत आवळे (वय ४२) व भाऊ प्रणव चंद्रकांत आवळे (वय २४) यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये विजया यांच्या खांद्याला फॅक्चर झाले असून तिघेही जखमी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -