प्रजासत्ताक दिन तोंडावर आला असतानाच राज्यावर ड्रोन हल्ल्याचे सावट आहे. त्यामुळे राज्याला केंद्रीय यंत्रणांकडून अलर्ट देण्यात आला आहे. यानंतर राजधानी मुंबईसह राज्यातील सर्व शहरांना अलर्ट देण्यात आला आहे.
डार्क नेटवरुन दहशतवाद्यांचे संभाषण उघड झाल्यानंतर केंद्रीय यंत्रणांनी याबाबत माहिती दिली. डार्क नेटच्या माध्यमातून मुंबईसह राज्यात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत असल्याचे समोर आले आहे.