ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्ह्यात नव्या वर्षापासून कोरोना रुग्णवाढीला सुरुवात झाली अन अवघ्या १०१२ दिवसात कोल्हापूर शहराबरोबरच आता ग्रामीण भागही कोरोनाने व्यापला असल्याने जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. आज जिल्ह्यात ३१५ नवे कोरोना बाधित आढळून आले. तर ३७ जण ३१५ बाधिताचा भर कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १३९६ इतकी आहे.
सुदैवाने आज कोरोना बळींची संख्या शुन्यावरच राहीली, हीच ती काय समाधानाची बाब म्हणावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी १६२२ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या, त्यामध्ये कोरोनाचे ३१५ नवे बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये एकट्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये १७१ रुग्ण आढळून आले आहेत, याबरोबरच आजरा-१, भुदरगड१, चंदगड-१, गडहिंग्लज-३, हातकणंगले-९, कागल-४, करवीर-३३. पन्हाळा ६, राधानगरी-५, शाहवाडी-९. आणि शिरोळ तालुका-४ तर इचलकरंजी नगरपरिषद -२९,जयसिंगपूर नगरपरिषद४, हुपरी नगरपरिषद-२, पेठवडगांव नगरपरिषद-२, आणि अन्य जिल्ह्यातील २१ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ८ हजार ४९७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी २ लाख १ हजार ३०० रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ५ हजार ८०१ जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या १३९६ इतकी आहे.
कोल्हापूर जिल्हा कोरोनाने व्यापला ३१५ बाधितांची भर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -