ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोरोनामुळे (Corona Virus) पुन्हा देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने (Covid-19)पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली असून रुग्णसंख्या (Corona Patient) देखील झपाट्याने वाढत आहे. एकीकडे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होतेय तर दुसरीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट (Corona New Variant) ओमिक्रॉनमुळे (Omicron) सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात ओमिक्रॉन रुग्णांची (Omicrona Patient) संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) वेगवेगळी पाऊलं उचलली जात आहेत. आता केंद्र सरकारने कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्याच्या पॉलिसीमध्ये (Corona Patient Discharge Policy) मोठा बदल केला आहे. कोरोनाच्या कोणत्या रुग्णाला हॉस्पिटलमधून (Hosptial)किती दिवसाने डिस्चार्ज देण्यात येणार हे सांगण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज पॉलिसीमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोरोनाच्या हलक्या आणि मध्यम लक्षणं (Mild to moderate symptoms of corona) असलेल्या रुग्णांना पॉझिटीव्ह आल्यानंतर कमीत कमी सात दिवस आणि सलग तीन दिवस ताप न आल्यास हॉस्पिटलमधून सुट्टी दिली जाणार आहे. या रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल (Love Agarwal, Secretary, Union Health Department) यांनी याबद्दल सांगितले की, ‘मध्यम श्रेणीतील रुग्ण, विना ऑक्सिजन सपोर्ट (without oxygen support ) आणि सतत 3 दिवस 93 टक्क्यांहून अधिक सॅच्युरेशन असलेले रुग्ण कुठल्याही टेस्टशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने हॉस्पिटलमधून घरी जाऊ शकतात. तसंच, जे रुग्ण सतत ऑक्सिजन थेरेपीवर आहेत त्यांनी लक्षणांबाबत समाधान झाल्यावर ऑक्सिजन सपोर्ट विना सलग तीन दिवस राहिल्यानंतर त्यांची क्षमता पाहून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. तर इम्युनोकॉम्प्रोमाइज्डसह अन्य गंभीर प्रकरणातील रुग्णांचा डिस्चार्ज मात्र क्लिनिकल रिकव्हरीवर अवलंबून असेल.
कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमधून कधी घरी सोडणार?, केंद्र सरकारने डिस्चार्ज पॉलिसीमध्ये केला बदल
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -