Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रराज्याला 40 लाख लसींची आवश्यकता : राजेश टोपे

राज्याला 40 लाख लसींची आवश्यकता : राजेश टोपे

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यात गुरुवारी दिवसभरात 46 हजार 406 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. काल राज्यात एकाही ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 64 हजार 202 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला 40 लाख लसींनी गरज आहे, मात्र सध्या राज्यात दोन ते तीन दिवस पुरेल एव्हढाच लसीचा स्टॉक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -