ताजी बातमी ऑनलाइन टीम
मागील रविवारी तीन गवे अंबप येथील जगताप घोळ नावाच्या शेती परिसरात आढळले होते. ते पाडळी व मनपाडळे येथील वास्तव्यानंतर काल शनिवारी ते तीन गवे करवीर तालुक्यातील मादळेच्या जंगल परिसरातून पोहाळेच्या दिशेने मार्गस्थ होताना मादळे येथील नागरिकांच्या निदर्शनास आले आहेत.
ते आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे परततील, असा वन अधिकार्यांचा अंदाज व्यक्त केला. मनपाडळेच्या सरहद्दीवर पोलिस पाटील शिवारात उसाच्या शेतात मागील दोन दिवस गव्यांचे वास्तव्य होते. त्यांचा शोध वन विभागाच्या वतीने सुरू होता. पण दाट उसाच्या शेतामुळे दोन दिवस ते गवे कोणाच्याही निदर्शनास आले नाहीत.
शनिवारी सकाळी अचानक मादळे (ता. करवीर) येथील गुराखी सुनील कांबळे यांना गावच्या पश्चिम बाजूस चार बंगले नावाच्या जंगल परिसरात दोन पूर्ण वाढ झालेले व एक मध्यम गवा निदर्शनास आला. ते तीन गवे पोहाळे, गिरोली, जोतिबा दिशेने जात असल्याचे कांबळे यांनी पाहिले. प्रामुख्याने गव्यांचा अधिवास जिल्ह्यातील दाजीपूर अभयरण्य, पन्हाळा जंगल परिसर आहे. अखेर गवे आपल्या नैसर्गिक अधिवासात मार्गक्रमण करत असल्याचा वन अधिकार्यांनी दुजोरा दिला.
मादळे परिसरात आढळले तीन गवे
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -