Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानकोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या कॅनने वाढवू शकता तुमच्या वायफाय चा स्पीड! जाणून घेऊयात ही...

कोल्ड्रिंक्सच्या रिकाम्या कॅनने वाढवू शकता तुमच्या वायफाय चा स्पीड! जाणून घेऊयात ही कमाल ट्रिक

सध्याच्या घडीला स्मार्टफोन प्रत्येकाकडेच असतो. अगदी त्याचप्रमाणे वाय-फाय कनेक्शन देखील जवळजवळ प्रत्येकाकडेच असते. तुमच्याही घरात वायफाय असेल आणि त्याचा स्लो स्पीडचा तुम्हाला त्रास होत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी एक अप्रतिम ट्रिक घेऊन आलो आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चुटकीसरशी वायफायचा स्पीड वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ट्रिकबद्दल.

आजकाल युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक मनोरंजक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. असे काही व्हिडिओ देखील आहेत ज्यांचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवले आहे की , कोल्ड्रिंकच्या रिकाम्या कॅनने तुम्ही तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये लावलेल्या वायफायचा स्पीड तुम्ही वाढवू शकता. तो कसा वाढवायचा ते आपण पाहुया.

सर्वप्रथम कोल्ड्रिंक्सचा रिकामा कॅन घ्यायचा. आता हा रिकामा डबा मधोमध कापून घ्या आणि मग या कॅनचा तुकडा तुमच्या वायफाय राउटरच्या अँटेनाला लावा. हे सर्व काम केल्यानंतर, तुम्हाला काही मिनिटे थांबावे लागेल. थोड्याच वेळात तुमच्या वायफायचा स्पीड आणि रेंज दोन्ही वाढलेलं तुम्हाला दिसून येईल. ही युक्ती एकदा नक्की वापरून पहा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -