भारत ही लोकशाहीची जननी आहे. लोकशाही, वादविवाद भारतात शतकानुशतके चालू आहेत. पण काँग्रेसची अडचण ही आहे की त्यांनी घराणेशाहीशिवाय कधीही विचार केला नाही. भारतातील लोकशाहीला कुटुंबावर आधारित पक्षांचा सर्वात मोठा धोका आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल. जेव्हा कुटुंबाला कोणत्याही पक्षात सर्वोच्च स्थान असते, तेव्हा सर्वात पहिला आघात हा प्रतिभेवर होतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. मंगळवारी ते राज्यसभेत बोलत होते.
जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा त्यांनी देशाचा विकास होऊ दिला नाही. आता विरोधी पक्षात असताना ते देशाच्या विकासात अडथळे आणत आहेत. ते आता ‘राष्ट्र’वर आक्षेप घेत आहेत. जर ‘राष्ट्र’ ही कल्पना असंवैधानिक असेल तर तुमच्या पक्षाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस का म्हणतात?, असा सवाल त्यांनी केला.