Thursday, February 19, 2026
Homeमहाराष्ट्रसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सार्वजनिक सुट्ट्याबाबतचा 'हा' नियम तुम्हाला माहिती आहे का?

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सार्वजनिक सुट्ट्याबाबतचा ‘हा’ नियम तुम्हाला माहिती आहे का?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नैमित्तिक रजेच्या नियमांबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या नैमित्तिक रजेच्या (Casual Leave) मागे किंवा पुढे कितीही रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

वित्त विभागाने 2- मार्च 1989 रोजी दिलेल्या तात्पुरत्या परवानगीला आता कायमस्वरूपी स्वरूप दिले असून, तसे आदेश निर्गमित केले आहेत.

 

सार्वजनिक सुट्ट्या आता कर्मचाऱ्यांना आपल्या रजेला जोडून घेता येतील

 

या नवीन नियमावलीनुसार, नैमित्तिक रजेच्या सुरुवातीला (Prefix), रजेच्या शेवटी (Suffix) किंवा रजेच्या मधल्या काळात येणारे रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या आता कर्मचाऱ्यांना आपल्या रजेला जोडून घेता येतील. तथापि, ही सवलत घेताना शासनाने काही मर्यादा देखील घालून दिल्या आहेत. एका वेळेस घेतलेली नैमित्तिक रजा आणि त्याला जोडून घेतलेल्या सार्वजनिक सुट्ट्या असा एकूण कालावधी कोणत्याही परिस्थितीत 7 दिवसांपेक्षा जास्त होता कामा नये. केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच ही मर्यादा 10 दिवसांपर्यंत वाढवून देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे.

 

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

 

शासनाच्या या निर्णयामुळे सलग सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने वित्त विभागाचे उप सचिव व्यं. दे. पानसे यांनी जारी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -