Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगCBSE Exam Date Released: CBSE ची 10 वी-12 वीची परीक्षा ऑफलाईन होणार,...

CBSE Exam Date Released: CBSE ची 10 वी-12 वीची परीक्षा ऑफलाईन होणार, बोर्डाने जाहीर केली तारीख

ताजी बातमी ऑनलाइन टीम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) 10 वी आणि 12 वीच्या (CBSE board Exam 2022) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. CBSE ने 10वी, 12वीची सेमिटर -2 ची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने (Offline Exam) घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे CBSE ने 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून CBSE ने दोन सेमिस्टरमध्ये (CBSE Term exams) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. नुकताच CBSE च्या Term 1 ची परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2021 मध्ये या परीक्षा घेण्यात घेण्यात आल्या होत्या. मात्र, आता CBSE बोर्डाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे Term-2 ची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

CBSE ने पहिल्या सत्रातील परीक्षा या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात घेतल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसून येत आहे त्यामुळे बोर्डानं दुसऱ्या सत्रातील परीक्षा ऑफलाईन (Offline exams of CBSE 10th and 12th) घेणायचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात बोर्डाने परीपत्रक जारी केले आहे.

परीपत्रकानुसार, 26 एप्रिल 2022 पासून परीक्षा सुरू होणार आहे. सॅम्पल पेपर देण्यात आलेल्याप्रमाणेच परीक्षेचा पॅटर्न असणार आहे, असे CBSE ने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी CBSE ची अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in वरून डाऊनलोड करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -