कोल्हापूर शहरातील आणखी सहा हजार सात-बारा बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्डमध्ये रूपांतर केले जाणार आहे. याकरिता तलाठ्यांच्या मदतीने नगरभूमापन कार्यालयाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे. महिनाभरानंतर हे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर शहरच्या नगरभूमापन कार्यालयाकडे 45 हजार 308 मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड आहे. याखेरीज या कार्यालयाच्या मर्यादेत 11 हजार 667 मिळकतींचे सात-बारा उतारे आहेत. हे सात-बारा रेकॉर्ड बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड केले जात आहे. आजअखेर यापैकी सुमारे 5 हजार सात-बारा बंद करण्यात आले असून त्याचे रूपांतर प्रॉपर्टी कार्डमध्ये करण्यात आले आहे.