Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमित्राला सोडण्यासाठी जाताना काळाचा घाला; ट्रॉलीला कार धडकून ३ मित्र जागीच ठार

मित्राला सोडण्यासाठी जाताना काळाचा घाला; ट्रॉलीला कार धडकून ३ मित्र जागीच ठार

ताजी बातमी ऑनलाइन टीम

श्रीगोंदा शहरातून काष्टी येथे मित्राला सोडविण्यासाठी निघालेली कार शेंडगेवाडी शिवारा ट्रॉलीला पाठीमागून धडकली. या अपघातात कारमधील तिन्ही मित्र जागीच ठार झाले. हा अपघात आज (ता.१३) मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. या अपघातात राहुल सुरेश आळेकर (वय २२ रा. श्रीगोंदा) केशव सायकर (वय २२ रा. काष्टी) आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय १८ रा. श्रीगोंदा) तिघेजण जागीच ठार झाले.

काष्टी येथील केशव सायकर या मित्राला सोडविण्यासाठी तिघे निघाले होते. हॉटेल अनन्यासमोर कार आली असता पुढे असणाऱ्या ट्रॉलीचा अंदाज वाहनचालकाला आला नाही. ट्रॉलीस पाठीमागून जोराची धडक बसल्याने कारमधील तिघे जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. तीन मित्रांच्या अपघाती निधनाने श्रीगोंदा आणि काष्टी गावावर शोककळा पसरली आहे.

श्रीगोंदा येथे मागील आठवड्यात उसाच्या ट्रॉलीस धडकून एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. आज पुन्हा ट्रॉलीस धडकून तिघांना आपले प्राण गमवावे लागले. कारखाना व पोलीस प्रशासन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत योग्य ती खबरदारी घेत नसल्याने असे अपघात घडत असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -