Friday, September 20, 2024
Homeतंत्रज्ञानगुगल' ने शोधली बेपत्ता मुलगी ; कसे ते तुम्हीच पहा

गुगल’ ने शोधली बेपत्ता मुलगी ; कसे ते तुम्हीच पहा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
वडिलांसोबत फिरायला गेलेली 11 वर्षीय मुलगी शनिवारी (दि.१२) रात्री बेपत्ता झाली होती. सुमारे चार तास शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी ‘गुगल’ची मदत घेतली. गुगलेनेही पोलिसांना निराश न करता अवघ्या अर्धा तासात बेपत्ता मुलीचा शोध घेतला. मुलीचा शोध घेणारा गुगल तुम्ही समजताय तो नसून शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान आहे.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर परिसरातील 11 वर्षीय मुलगी रात्री दहा नंतर तिच्या वडिलांसोबत फिरायला गेली होती. काम असल्याने वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने वडील घरी गेले त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही. मुलीचा शोध सुरू झाला. ११ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना समजली. घटनेची माहिती समजताच उपनगर पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. मुलीचा शोध तिच्या घराजवळील परिसरातच सुरू होता.

नातलग आणि पोलिसांनी परिसरातील बहुतांशी घर, टेरेस, मैदान, इमारतींच्या गच्ची सर्व ठिकाणी मुलीचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. रात्री १२.३० च्या सुमारास पोलिसांनी गुगलची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गुगलला घटनास्थळी बोलवले. गुगलला बेपत्ता मुलीच्या कपडे व चपलांचा वास दिला. त्यानंतर गुगलेने त्याची जबाबदारी चोख बजावली. वडिलांनी मुलीला जेथे सोडले तेथून गुगलने मुलीचा मार्ग काढला. मुलगी ज्या मार्गाने गेली तसाच मार्ग गुगलने दाखवला. परिसरातीलच अंधारातून मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांना आणि पालकांना पाहून मुलीच्या चेहऱ्यावरील भीती दूर झाली. पोलिसांनी मुलीची प्राथमिक चौकशी करून तिला पालकांच्या ताब्यात सोपवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -