ताजी बातमी ऑनलाईन टीम
दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २४ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. सुनीलकुमार रामप्रसाद राम (रा. छिपुलीया,बिहार) असे त्याचे नाव आहे. हा अपघात इचलकरंजी-जयसिंगपूर मार्गावर खोतवाडी येथे १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात सुनिल कनवाडे (रा. विकासनगर, इचल.) हा जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी कि, कबनूर येथील ऋषिकेश चंद्रकांत सुतार (वय ३०, रा.केटकाळेनगर) व सुनीलकुमार राम हे दोघे कोंडीग्रे फाट्याजवळील सायझिंगमध्ये काम करत होते. काम संपल्यावर ते दोघे आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. खोतवाडीतील संत गजानन महाराज मंदिराजवळ आले असता सुनिलकुमार राम याच्या भरधाव दचाकीने समोरून येणाऱ्या सुनिल कनवाडे यांच्या दचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात राम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघात सुनिल कनवाडे हा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
इचलकरंजी ; दुचाकींच्या धडकेत एक ठार; एक जखमी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -