Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनalia bhatt : मी रणबीरशी यापूर्वीच लग्‍न केलेय!

alia bhatt : मी रणबीरशी यापूर्वीच लग्‍न केलेय!


आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि या कपलच्या लग्‍नाच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू झाल्या आहेत. आता दोघे एप्रिलमध्ये लग्‍न करतील, अशी शक्यता आहे. याविषयी बोलताना नुकतेच आलिया म्हणाली की, मी मनातल्या मनात रणबीरशी आधीच लग्‍न केले आहे. खरेतर, कोरोनाने आमच्या लग्‍नाचे नियोजन बिघडवले, असेही आलिया म्हणाली. दरम्यान, एप्रिलमध्ये लग्‍नासाठी दोघांच्याही घरातून तयारी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. राजस्थानातील रणथंबोर येथे हे लग्‍न होऊ शकते. हे स्थळ दोघांचेही आवडीचे ठिकाण आहे.

दरम्यान, हे रीयल लाईफ कपल आता रील लाईफमध्येही एकत्र दिसणार आहे. त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची एक एक अपडेट आता समोर येत चालली आहे. ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील दोघांचा एक फोटो आता व्हायरल झाला आहे. चित्रपटाच रणबीरच्या भूमिकेचे नाव आहे शिवा आणि आलियाच्या कॅरेक्टरचे नाव आहे ईशा.

दोघांच्या मधे एक गेट असून दोघांनी एकमेकांचे हात हातात घेतले असून ते एकमेकांच्या डोळ्यात पाहताना बुडून गेले असल्याचे फोटोत दिसते. हा चित्रपट तीन भागात रीलीज होणार असून त्याचा पहिला भाग 9 सप्टेंबर 2022 रोजी येत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन आणि छोट्या भूमिकेत शाहरूख खानही दिसणार आहे. अयान मुखर्जीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटावर जवळपास 6 वर्षांपासून काम सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -