ताजी बातमी ऑनलाईन टीम
नेटफ्लिक्सवरील दक्षिण कोरियाई थ्रिलर वेबसीरिज ‘स्क्विड गेम’ आता अमेरिकेत थिएटर्समध्ये रीलिज करण्यात येणार आहे. या वेबसीरिजचा पहिला सिझन 19 फेब्रुवारी रोजी
न्यूयॉर्कच्या नेटफ्लिक्सद्वारे संचलित पॅरिस थिएटर आणि लॉस एंजलिस येथील बे थिएटरमध्ये एकाचवेळी प्रदर्शित केला जाईल. गतवर्षीची सर्वाधिक चर्चा झालेली ही वेबसीरिज ठरली आहे. डोक्यावर कर्ज असलेल्या 465 लोकांना पैशाचे लालूच दाखवून त्यांना लहान मुलांच्या खेळावर आधारित एक गेम खेळायला लावला जातो, पण प्रत्येक टप्प्यावर यातील अनेक जण मरत जातात आणि जो शिल्लक राहतो तो विजेता ठरतो, असे या सीरिजचे कथानक आहे. या सीरिजचा दुसरा सिझनही येणार आहे.