पुन्हा एकदा मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांच्या घोषणा सुरू झाल्या आहेत. एकापाठोपाठ एक मोठे स्टार्स त्यांच्या चित्रपटाच्या रिलीजसाठी सुरक्षित तारीख निवडण्यासाठी स्पर्धा करत आहेत. पण कोरोनामुळे खूप चित्रपटांचे रिलीज रखडले आहे. त्यामुळे त्यांच्या तारखा क्लॅश होणारच. काही वेळापूर्वीच अक्षय कुमार आणि आमीर खानच्या चित्रपटांच्या क्लॅशची बातमी समोर आली आहे. शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ ची नवीन रिलीज डेट 14 एप्रिल 2022 अशी निश्चित करण्यात आली आहे, ज्या दिवशी ‘KGF Chapter 2’ हा सर्वात मोठा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याच्या काही दिवसांनंतर आमिर खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट क्लॅश होण्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
आमिरने 11 ऑगस्ट 2022 रोजी त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे, तर त्याच दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे. हा या वर्षातील सर्वात मोठा क्लॅश मानला जात आहे. अक्षय कुमार हा सध्या बॉक्स ऑफिसचा बादशाह मानला जात असला तरी आमिरचा चित्रपट आला की सगळे रेकॉर्ड मोडीत निघतात. त्यामुळे ही टक्कर जोरदार होणार आहे.
प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून ही माहिती दिली आहे की, अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपटही आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’सोबत रिलीज होणार आहे. ‘रक्षा बंधन’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा कोणताही विचार केलेला नाही. असेही सांगण्यात आले आहे. तरुण आदर्श यांनी म्हटले आहे की, आमिरचा चित्रपट कोणाबरोबर क्लॅश करत नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण जसजशी समीकरणे तयार होत आहेत, तसतसा हा चित्रपट इतर कोणत्या चित्रपटासोबत क्लॅश न करण्याची शक्यता कमी झाली आहे.