ताजी बातमी ऑनलाइन टीम
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ‘गंगूबाई’ ची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर आली असून हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडल्याचे दिसून येत आहे. गंगुबाईचा मुलगा बाबू रावजी शाह यांनी आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर बनविल्याचा खुलासा केला आहे.
गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट येत्या २५ फेब्रुवारी २०२१ रोजी थिअटरमध्ये भेटीस येत आहे. वास्तविक गंगूबाईच्या कुटुंबीयांना या चित्रपटाची संकल्पना समजली नसून त्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनीही बदनामी होत
असल्याने न्यायालयात धाव घेतली आहे. आता या चित्रपटाबाबत गंगूबाईचे कुटुंबीय आणि तिच्या वकिलाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
गंगुबाईचा मुलगा बाबू रावजी शाह यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,’ गंगुबाई काठियावाडी या माझ्या आईला सोशल वर्करपासून सेक्स वर्कर बनविले असल्याचा खुलासा केला आहे. तसेच विनाकारण लोक माझ्या आईबद्दल काहीही बोलत असल्याचे देखील सांगितले आहे. गंगूबाईची नात भारती म्हणाली की, निर्मात्यांना फक्त पैसे कमविण्यासाठी हा चित्रपट बनविला असून तिच्या कुटुंबाची बदनामी करत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या चित्रपट बनविण्यासाठी कुटुंबीयांची संमती घेण्यात आली नसल्याचे देखील सांगितले आहे. तसेच तिने हुसैन जैदी यांनी गंगूबाईंवर ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. यावेळी सुद्धा त्यांच्याकडून परवानगी घेण्यात आली नसल्याचा खुलासा केला आहे.